Akshay Nirmale
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला तरी गोव्यावर मात्र पोर्तुगीजांचे राज्य असल्याने गोवा स्वतंत्र झाला नव्हता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 14 वर्षांनी गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला.
1947 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा आणि इतर भागावरील त्यांचा अधिकार सोडण्यास नकार दिला. भारताने 1955 मध्ये गोव्यावर आर्थिक निर्बंध लादले. पण तरीही पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली नाही.
राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गोवा मुक्त करण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
पोर्तुगाल 'नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन' (नाटो) चा सदस्य होता. त्यामुळे पोर्तुगीजांविरोधात लढणे सोपे नव्हते. कारण त्यांना नाटो देशांचा पाठिंबा होता. यामुळे लष्करी बळाचा वापर करणे नेहरूंना नको होते.
नोव्हेंबर 1961 मध्ये पोर्तुगीज सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एका मच्छिमाराचा मृत्यू झाला. त्यानंतर पंतप्रधान नेहरूंनी लगेचच संरक्षण मंत्री केव्ही कृष्ण मेनन यांच्याशी बैठक घेत लष्करी कारवाईचा निर्णय घेतला.
या बैठकीनंतर 17 डिसेंबर रोजी ऑपरेशन विजय सुरू करण्यात आले, ज्याचा उद्देश गोवा मुक्त करणे हा होता. या मोहिमेअंतर्गत नौदल, लष्कर आणि हवाई दलाचे 30 हजार सैनिक तैनात केले.
अवघ्या 36 तासांत 19 डिसेंबर 1961रोजी पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली. तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर मेन्यू वासालो डी सिल्वा यांनी आत्मसमर्पण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.