Akshay Nirmale
गोवा भारतात सामिल करून घेण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन विजय या नावाने लष्करी कारवाई केली होती.
भारताच्या आक्रमणानंतर पोर्तुगालने केवळ 36 तासांत शरणागती पत्करली आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा भारतात सामिल झाला.
तथापि, गोवा भारतात सामिल होणे ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर हा भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा आणि कुटनीतीचाही विजय होता.
गोवा हातातून गेल्यानंतर जळफळाट झालेल्या पोर्तुगालने संयुक्त राष्ट्रात हा विषय नेला होता. भारताने सैन्य मागे घ्यावे, असा प्रस्ताव पोर्तुगालने मांडला होता.
अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन, इक्वेडोर, चिली, ब्राझिल यांनी पोर्तुगालच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला तर तत्कालीन सोव्हिएत रशिया, लायबेरिया, श्रीलंका या देशांनी भारताला पाठिंबा दिला होता.
पोर्तुगालच्या या प्रस्तावाला सोव्हिएत रशियाने व्हेटो (नकाराधिकार) चा वापर करून विरोध दर्शविला.
संयुक्त राष्ट्रातील पाच कायम सदस्य असलेल्या अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन यांना व्हेटोचा अधिकार आहे. यापैकी एकाही राष्ट्राने विरोध दर्शविला तर तो प्रस्ताव मान्य होऊ शकत नाही.