Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघ डिसेंबर 2023 महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 3 वनडे सामने, 3 टी20 सामने आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, वनडे आणि टी20 संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. त्यांना केवळ कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आले आहे.
रोहित आणि विराटला वनडे आणि टी२० संघात जागा न देण्यामागचे कारण बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने सांगितले आहे की रोहित आणि विराट यांनीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकांसाठी विश्रांती मागितली होती. त्यांची ही विनंती मान्य केली असून त्यांना केवळ कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
त्याचमुळे रोहित आणि विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ कसोटी मालिकेत खेळताना दिसली.
या दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत वनडे संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे, तर टी२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. कसोटी मालिकेत मात्र रोहितच कर्णधार असेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 10 ते 14 डिसेंबर दरम्यान टी20 मालिका, 17 ते 21 डिसेंबर दरम्यान वनडे आणि 26 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.