Pranali Kodre
भारताने 1 डिसेंबर 2023 रोजी रायपूरला झालेल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 20 धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 32 धावांची खेळी केली.
या खेळीसह त्याने टी20 कारकिर्दीत 4000 धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे ऋतुराज सर्वात कमी डावात 4000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने 116 टी20 डावात 4000 धावा पूर्ण केल्या आहेत.
त्याने सर्वात कमी डावात 4000 टी20 धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत केएल राहुल (117 डाव) आणि विराट कोहलीला (138 डाव) मागे टाकले आहे.
दरम्यान, सर्वात कमी डावात 4000 टी20 धावा करणाऱ्या जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये ऋतुराजने चौथ्या क्रमांकावर असलेल्या डेवॉन कॉनवेची बरोबरी केली आहे. कॉनवेने देखील 116 डावातच टी20 क्रिकेटमध्ये 40000 धावा पूर्ण केल्या होत्या.
सर्वात कमी डावात 4000 टी20 धावा करणाऱ्या एकूण फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने 107 डावात 4000 टी20 धावा केल्या आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शॉन मार्शने 113 डावात 4000 टी20 धावा केल्या होत्या.
तिसऱ्या क्रमांकावर बाबर आझम असून त्याने 115 टी20 डावात 4000 धावा केल्या होत्या.
चौथ्या क्रमांकावर कॉनवे आणि ऋतुराज आहे, तर पाचव्या क्रमांकावर केएल राहुल आहे.