मडगावात एकाच खोलीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू कशामुळे झाला?

Pramod Yadav

गूढ मृत्य़ू

आके येथील एका फ्लॅटमध्ये बुधवारी (दि.24)  दोघे सख्खे भाऊ गूढरित्या मृतावस्थेत आढळले.

आई अत्यवस्थ

तर त्यांची आई फ्लॅटमधील त्याच खोलीत अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली.

आई मनोरुग्ण

चौकशीवेळी त्यांची आई मनोरुग्ण असल्याचे आढळून आल्याने या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.

झुबेर आणि अफान

महम्मद झुबेर खान (29) आणि अफान खान (27) अशी मृतांची नावे आहेत, तर रुक्साना खान (54) असे त्यांच्या आईचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी मृत्यू

या दोन्ही भावांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फ्लॅटमध्ये अन्न नव्हते

पोलिसांच्या माहितीनुसार, फ्लॅटमध्ये अन्नपाण्याचा एक कणही नव्हता. उपासमारीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शवचिकित्सा

दरम्यान, शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या दोघा भावांच्या मृत्यूस कोण कारणीभूत आहे, याचा पोलिस सध्या शोध घेत आहेत.

आणखी पाहण्यासाठी