Goa Myths: गोवावाले बीच पर.....इथे येण्यापूर्वी हे गैरसमज दूर करा

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात राहणाऱ्याचं आयुष्य

गोवा म्हटलं की तुमच्या मनात पाहिलं विचार काय येतो? गोवा पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध झाल्याने अनेकवेळा आपण जे टीव्हीवर किंवा चित्रपटामधून पाहतो त्याच चित्रावर विश्वास ठेवतो. पण गोव्यात राहणाऱ्याचं आयुष्य आणि आपण करत असलेला विचार यात किती तफावत आहे माहितीये का?

दारूला विरोध

गोव्यातली लोकं दिवसभर दारू पित नाहीत. गोव्यातल्या लोकांच्या घरात दारूच्या बाटल्या नसतात. याउलट इथे काही घरं अशीही आहेत जिथे दारूला विरोध केला जातो. गोव्यात दिवसाची सुरुवात मस्त चहा पिऊनच होते.

शाकाहारी लोकं

गोव्यात राहणार प्रत्येक माणूस हा मांसाहारी नसतो. गोव्यात अनेक शाकाहारी लोकं आहेत आणि इथल्या शाकाहारी पदार्थांना तोड नाही.

अँथनी गोंजाल्विस

गोव्यातली लोकं फुलाफुलांचे कपडे घालून वावरत नाहीत. बॉलीवूडमधून प्रसिद्ध झालेल्या अँथनी गोंजाल्विसमुळे हे चित्र तयार झालं असलं तरीही यात काहीच तथ्य नाही.

आठवड्याभराचं प्लॅनिंग

गोवा जरी छोटंसं राज्य असलं तरीही एका दिवस पूर्ण गोवा फिरणं शक्य नाही. गोव्याचा प्रत्येक कोपरा पाहायचा असेल तर नक्कीच आठवड्याभराचं प्लॅनिंग करा.

मारिया किंवा ऍंथोनी

गोव्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं नाव मारिया किंवा ऍंथोनी नाही, इथे नावांची वेगळीच मजा आहे आणि सर्वांना खास अर्थ आहे.

पार्टी हब

गोव्यातील प्रत्येक ठिकाण हे पार्टी हब नाही, इथे अनेक मंदिरं, मस्जिद आणि चर्चेस आणि इतर प्रमुख स्थळं आहेत.

आणखीन बघा