Sameer Panditrao
अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे असे बदल शरीरामध्ये का होतात जाणून घेऊया.
लो ब्लड प्रेशर (Hypotension) — रक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो.त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं.
दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो.
रक्तात ऑक्सिजन कमी वाहून नेला जातो, त्यामुळे मेंदू व डोळ्यांना योग्य पुरवठा होत नाही. परिणामी अंधारी येते, श्वास लागतो.
पुरेसे पाणी, लस्सी, ताक न घेतल्याने रक्तदाब कमी होतो आणि डोळ्यासमोर काळं येतं.
अंतर्गत कानातील संतुलन केंद्रावर परिणाम झाल्यास गरगरल्यासारखं वाटतं.
सततचा मानसिक ताण, भीती, झोप न लागणे — यामुळेही चक्कर येऊ शकते.