Sameer Amunekar
अशा लोकांची भावना खूप नाजूक असते. कुणाचं बोलणं, नकार किंवा टीका त्यांना थेट मनाला लागते.
हे लोक दुसऱ्यांच्या दुःखाशी पटकन जोडले जातात. इतरांच्या वेदना आपल्या वाटतात आणि डोळ्यात पाणी येतं.
एखादी नकारात्मक प्रतिक्रिया, अपयश किंवा उपेक्षा सहन होणं कठीण जातं, आणि त्यामुळे रडू येतं.
सततचा मानसिक थकवा, ताण-तणाव किंवा झोपेचा अभाव यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं.
मागील आयुष्यातील दुःख, आघात किंवा दुखःद अनुभव डोक्यात खोलवर रुतलेले असतात. त्यामुळे साधं काही बोललं तरी भावनांचं ओझं डोळ्यातून वाहतं.
विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा किंवा मेनोपॉजमुळे हार्मोन्सची असंतुलित स्थिती भावनिक अस्थिरता निर्माण करते
जेव्हा व्यक्तीची मनस्थिती ऐकून घेण्यासाठी कोणी नसतं, तेव्हा मन भरून येतं आणि थोडंसं बोललं की अश्रू ओघळतात.