Sameer Panditrao
भगवान श्रीकृष्णाला मुरारी या नावाने ओळखले जाते पण यामागची कथा तुम्हाला माहिती आहे का?
ही कथा नरकासुराशी जोडली गेलेली आहे. नरकासुराने सर्वत्र उत्पात माजवला होता.
देवदेवतांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली.
भगवान विष्णूंनी कृष्णावतारात नरकासूराचा वध करणार असल्याचे सांगितले.
पत्नी सत्यभामेसह श्रीकृष्णांनी नरकासुरावर हल्ला केला आणि त्याचा वध केला.
नरकासुराचा सेनापती मुरा जो प्रचन्ड क्रूर होता, त्याचा श्रीकृष्णांनी वध केला.
या प्रसंगामुळे भगवान श्रीकृष्णांना मुरारी या नावाने ओळखले जाऊ लागले.