Akshata Chhatre
आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील महान कूटनीतिज्ञ आणि दूरदर्शी विचारवंत होते.
त्यांच्या मते, आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी केवळ प्रामाणिक असून चालत नाही, तर व्यवहारी असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
चाणक्य म्हणतात की, आपली सर्व बुद्धिमत्ता आणि योजना प्रत्येकासमोर उघड करणे धोक्याचे ठरू शकते.
अनेकदा समोरच्या व्यक्तीची चाल समजल्यानंतरही गप्प राहणे आणि 'मूर्ख' बनण्याचे नाटक करणे हा सर्वात शहाणपणाचा मार्ग असतो.
यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा खरा हेतू ओळखण्याची संधी मिळते.
तसेच, जेव्हा लोक तुमचा फायदा घेऊ लागतात, तेव्हा स्वतःच्या हिताचा विचार करणे म्हणजेच 'स्वार्थी' होणे हे आत्मसन्मानासाठी आवश्यक असते.
स्वतःच्या हक्कांचे रक्षण करणे हा स्वार्थ नसून तो शहाणपणा आहे. संयम, चतुरता आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय हेच खऱ्या यशाचे गमक आहे.