Pramod Yadav
छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सातासमुद्रापार बसलेल्या राजांपर्यंत पोहोचली होती.
पोर्तुगीज लोक विश्वास ठेवण्यास पात्र नाही, असे प्रसंग दोन वेळा घडल्याने शिवाजी महाराज कधीही आक्रमण करतील, अशी परिस्थिती होती.
त्यामुळे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या मोहीमांवर लक्ष ठेवायचे.
गोव्याच्या व्हाइसरॉयने कोंट व्ही रेईने पोर्तुगालच्या राजाला पत्र पाठवले होते. शिवाजी महाराजांचे आग्र्याहून पलायनाबाबत उल्लेख त्यात होता.
शिवाजी महाराज शिताफीने फळांच्या पेटाऱ्यातून बसून तुरुंगातून बाहेर पडले, असं व्हाईसरॉयने लिहिले होते.
चातुर्य, पराक्रम, चपलता, लष्करी बुद्धी ही शिवाजी महाराजांची बलस्थानं आहेत, असं त्याने पोर्तुगालच्या राजाला सांगितेल होते.
शिवाजी महाराज नाहीत अशी एकही जागा नाही, ते संपूर्ण आशियाशी युद्ध करत आहेत, मोगल सैन्याला न जुमानता त्यांनी सुरत लुटले, याकडेही त्यानं लक्ष वेधलेलं.
जमिनीप्रमाणे समुद्रातही त्यांचा दरारा आहेत, त्यांच्या आरमाराची भिती वाटते. समुद्र किनाऱ्यावर त्यांचे किल्ले आहेत, बऱ्याच लहान युद्ध नौकाही आहेत, असं त्यानं पत्रात म्हटलेलं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने, पोर्तुगीज दप्तरे – खंड तिसरा आशिया विभाग या माहिती कोशात 1667 मधील गोवा व्हॉइसरॉय- पोर्तुगीज पत्रव्यवहाराचे संदर्भ आहेत.