Pramod Yadav
स्टारलिंक ही उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीद्वारे पुरवली जाणारी इंटरनेटसेवा आहे.
उपग्रहांच्या (सॅटेलाईट) मदतीने दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट सेवा पुरवली जाते.
जगातील जवळपास १०० देशांमध्ये ही सेवा दिली जात असून, नुकताच भारतातही सेवेने प्रवेश केला आहे.
भूमीगत फायबर केबल, टॉवरच्या मदतीने मिळणारे नेटवर्कपेक्षा स्टारलिंक इंटरनेटसेवा वेगळी आहे.
स्टारलिंक लो अर्थ ऑर्बिटींग सॅटेलाईच्या (LEO) मदतीने हायस्पीड इंटरनेटसेवा पुरवते.
जानेवारी २०२४ मध्ये मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने असे ७० स्टारलिंक उपग्रह अवकाशात सोडले आहेत.
स्टारलिंक डिश आणि राऊटरच्या मदतीने उपग्रहासोबत कनेक्ट केले जाते आणि युझरला नेटसेवा उपलब्ध होते.
घरात, ऑफीसमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो, काही अतिरिक्त उपकरणांच्या मदतीने धावते वाहन, विमानात देखील सुविधा मिळू शकते असे कंपनीने म्हटले आहे.