Akshata Chhatre
गोवा हा अनेक प्रकारच्या प्रेक्षणीय स्थळांची ओळखला जातो. यांपैकीच एक म्हणजे दक्षिण गोव्यातील काबो दे रामचा किल्ला. पण तुम्ही कधी विचार केलाय का या किल्ल्याला राम हे नाव का पडलं असेल?
काबो दे राम या किल्ल्याला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे पोर्तुगीजांची सत्ता येऊन देखील हे महत्व कायम आहे.
तर काबो दे राम हे नवा किल्याला श्रीरामांच्या नावावरून पडलं. पौराणिक कथेनुसार वनवासाच्या काळात श्रीराम इथं आले होते.
पोर्तुगीज भाषेत काबो याचा अर्थ टोकाचं ठिकाण असा होतो आणि रामा म्हणजे श्रीराम. त्यामुळे काबो दे रामा याचा अर्थ रामाचं ठिकाण.
हा किल्ला कर्नाटकातील सौंदा राजवटीच्या स्थानिक राज्यांनी बांधला होता. हा किल्ला सुरुवातीला “राम किल्ला” या नावाने ओळखला जात होता.
१७६३ मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर आक्रमण केलं आहे आणि त्यानंतर या किल्ल्याचं नाव बदलून काबो दे राम असं ठेवण्यात आलं.
यानंतर किल्ल्याने मराठे, मुघल, पोर्तुगीज यांच्या अनेक लढाया पहिल्या आणि आज हा किल्ला एक महत्वाचं प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखला जातोय.