Akshata Chhatre
पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत, पण आणुस्करा घाट मार्गे जाण्याचा अनुभव आगळा-वेगळा आहे. हा मार्ग निसर्गरम्य, शांत आणि कमी गर्दीचा असल्याने प्रवास सुखद होतो. चला, या प्रवासाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया!
या घाटातून जाण्यासाठी एकूण अंतर सुमारे 450-470 किलोमीटर आहे.
कोकणातील सर्वात सुंदर घाटांपैकी एक, जिथे घनदाट जंगल, आल्हाददायक हवा, वळणदार रस्ते आणि हिरवेगार डोंगर पाहायला मिळतात.
पश्चिम घाटाचे मंत्रमुग्ध करणारे दृश्य, , हिरवाईने नटलेले सुंदर कोकणी गाव, तलाव आणि कोकणी संस्कृतीचे दर्शन.
पुणे-कोल्हापूर महामार्ग उत्तम स्थितीत आहे. आंबोली किंवा आंबा घाटाच्या तुलनेत कमी गर्दी आणि जास्त निसर्गरम्यता पाहायला मिळते. प्रवासदरम्यान घाटातील थंड हवा आणि हिरवाईचा मनमोहक अनुभव मिळतो.
मान्सूनमध्ये घाट मार्ग निसरडा होतो, त्यामुळे वाहन काळजीपूर्वक चालवा. इंधन आणि जेवण्याची इथे मर्यादित सोय उपलब्ध आहे. सुंदर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मधून-मधून विश्रांती घ्या आणि फोटोग्राफी करा!