Sameer Panditrao
रो रो फेरीबोट कार्गो जहाज प्रकारात येतात.
रोल ऑन - रोल ऑफ टेक्निकमुळे या फेरीबोटींना रो रो असे म्हणले जाते.
या फेरीबोटीत प्लॅटफॉर्मवरती वाहने क्रेनने उचलून आणावी लागत नाहीत.
स्वतःच्या चाकावर ती फेरीबोटीच्या प्लॅटफॉर्मवर येत असल्याने रो रो फेरोबोट प्रसिद्ध होत आहे.
गोव्यात नुकतीच रो रो फेरी सेवा सुरु झाली आहे.
सध्या ती चोडण रायबंदर मार्गावर सुरु आहे.
इतर मार्गावरती ही सेवा सुरु करण्याचा सरकार विचार करत आहे.