Sameer Panditrao
गोव्यात रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ रायबंदर-चोडण जलमार्गावर होत आहे. या बोटी बांधण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च आला आहे.
‘द्वारका’ आणि ‘गंगोत्री’ या दोन्ही रो-रो फेरीबोटींची बांधणी विजय मरीनने केली आहे.
रो-रो फेरीबोटीमधून एकाचवेळी १५ कार, ४० दुचाकी आणि १०० लोक प्रवास करू शकतील.
फेरीबोटीमध्ये प्राथमिक उपचारसेवाही उपलब्ध असेल. त्यासाठी लागणारे प्रशिक्षित कर्मचारीही बोटीवर तैनात असतील.
दोन्ही फेरीबोटींच्या कॅप्टनना १०० तासांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सकाळी ७ ते रात्री दहा वाजेपर्यंत या ही फेरीबोट सेवा सुरू राहील.
स्थानिकांना गोव्यातील रहिवासी असल्याचे ओळखपत्र दाखवावे लागेल. अन्यथा शुल्क आकारले जाईल.
या बोटींची बांधणी आठ महिने सुरू होती. या बोटीसाठी दोन मोठी इंजिन बसविली आहेत. ही बोट ३६० डिग्रीमध्ये फिरू शकते. भरतीवेळीही ही बोट सुरक्षितपणे मार्गक्रमण करते.