'नो बॉयफ्रेंड, नो टेन्शन!' मुलींना सिंगल राहणं का वाटतं सुखाचं?

Manish Jadhav

करिअर आणि स्वप्नांना प्राधान्य

आजच्या काळात मुली कोणत्याही बंधनात न अडकता स्वतःचे भविष्य आणि करिअर घडवण्याला पहिली पसंती देतात.

Girl | Dainik Gomantak

स्वतःचे स्वातंत्र्य आणि स्पेस

'कुठे गेली होतीस?', 'कोणाशी बोलतेस?' अशा टोमण्यांशिवाय स्वतःच्या अटींवर जगणे आणि स्वतःसाठी मोकळा वेळ (Me Time) मिळवणे मुलींना जास्त आवडते.

Girl | Dainik Gomantak

जुन्या वाईट अनुभवांची भीती

भूतकाळातील 'हार्टब्रेक' किंवा नात्यातील कटू अनुभवांमुळे अनेक मुली पुन्हा कोणावरही विश्वास ठेवण्यास घाबरतात आणि सिंगल राहणेच सुरक्षित समजतात.

Girl | Dainik Gomantak

नात्यातील ड्रामा आणि कटकटी नकोत

रोजची भांडणे, संशय आणि नात्यातील मानसिक ताणतणाव सांभाळण्यापेक्षा सिंगल राहून शांततेत जगणे आजच्या पिढीतील मुलींना जास्त सोयीचे वाटते.

Girl | Dainik Gomantak

आर्थिक स्वावलंबन

आजच्या मुली आर्थिकदृष्ट्या खंबीर आहेत. स्वतःचे खर्च स्वतः उचलण्याची ताकद असल्याने त्यांना कोणत्याही गरजांसाठी पार्टनरवर अवलंबून राहावे लागत नाही.

Girl | Dainik Gomantak

योग्य जोडीदाराची प्रतीक्षा

केवळ नावापुरते किंवा तडजोड म्हणून नात्यात अडकण्यापेक्षा, जोपर्यंत विचारांशी जुळणारा आणि आदर करणारा योग्य जोडीदार मिळत नाही, तोपर्यंत मुली थांबणे पसंत करतात.

Girl | Dainik Gomantak

सेल्फ लव्ह आणि मित्रमैत्रिणी

स्वतःवर प्रेम करणे, स्वतःचे छंद जोपासणे आणि कोणत्याही बंधनांशिवाय मित्रमैत्रिणींसोबत बिनधास्त लाईफ एन्जॉय करणे यातच अनेक मुलींना खरा आनंद मिळतो.

Girl | Dainik Gomantak

Monsoon Trekking: धुक्याची गडद चादर अन् सोसाट्याचा वारा, पावसाळी ट्रेकचा बादशहा 'सिंहगड'; तानाजी मालुसरेच्या शौर्याची देतो साक्ष

आणखी बघा