Sameer Amunekar
अनेकदा एकाच नात्यात ठराविक वेळेनंतर उत्साह कमी होतो. नवीन नात्याचं आकर्षण काही पुरुषांना अधिक भुरळ घालतं.
प्रेमविवाहानंतर अपेक्षा जास्त असतात. परंतु संवादाचा अभाव, भांडणं, किंवा असमाधान यामुळे तो दुसरीकडे मानसिक आधार शोधू लागतो.
काही पुरुषांना अजूनही स्वतःची ‘मार्केट व्हॅल्यू’ तपासायची असते. दुसऱ्या महिलेकडून मिळणारी प्रशंसा त्यांना आकर्षित करते.
शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष झाल्यास, पुरुष कधी कधी बाहेर आकर्षण शोधतात. हे केवळ वासनेपोटी नसून भावनिक देखील असू शकतं.
मूल झाल्यानंतर स्त्रीचं लक्ष मुलाकडे जास्त जातं, यामुळे काही पुरुष उपेक्षित वाटतात आणि ते इतरत्र जवळीक शोधू लागतात.
सहज उपलब्धता, गोपनीयता आणि व्यसनासारखी अॅप्स वापरण्याची सवय विवाहबाह्य संबंधांना चालना देऊ शकतात.