Parenting Tips: लाडाच्या मर्यादा ठेवा! एकुलत्या एक मुलाला घडवताना 'हे' विसरू नका

Sameer Amunekar

"नाही" म्हणायला शिका

प्रत्येक गोष्ट मिळते म्हणून मूल हट्टी किंवा स्वार्थी होऊ शकतं. कधी कधी नकार देणं हेही संस्काराचाच भाग आहे.

Parenting Tips | Dainik Gomantak

जबाबदारीचं भान देणं गरजेचं

एकुलता एक असला तरी त्याला घरातील छोट्या कामांची जबाबदारी द्या – उदा. आपली वस्तू जागेवर ठेवणं, पाणी भरून ठेवणं इ.

Parenting Tips | Dainik Gomantak

स्वतःच्या चुका स्वीकारायला लावा

त्याने केलेल्या चुका दुसऱ्यांवर ढकलू न देता त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्या. यामुळे प्रामाणिकपणा आणि आत्मपरीक्षणाची सवय लागते.

Parenting Tips | Dainik Gomantak

समजावून सांगा

जीवनात संघर्ष करावा लागतो हे शिकवणं गरजेचं आहे. प्रत्येक मागणं पूर्ण करणं टाळा.

Parenting Tips | Dainik Gomantak

सामाजिक संवाद वाढवा

एकुलता एक मूल एकटं पडू शकतं, त्यामुळे त्याला इतर मुलांबरोबर खेळायला, संवाद साधायला प्रोत्साहित करा.

Parenting Tips | Dainik Gomantak

शिस्त

प्रेमात शिस्त मिसळली कीच योग्य व्यक्तिमत्त्व घडतं. वेळच्या वेळी झोपणं, खाणं, अभ्यास आणि मोबाईल/टीव्हीचा मर्यादित वापर याबाबत नियम ठरवा.

Parenting Tips | Dainik Gomantak

तुमचं मुलं बनेल जबाबदार नागरिक! 'या' 6 गोष्टी शिकवा

Parenting Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा