Sameer Amunekar
तुम्ही कधी ना कधी लिफ्टचा वापर नक्कीच केला असणार.
पण तुम्हाला एकदा तरी प्रश्न पडला असेल, की लिफ्टमध्ये आरसा नेमका कशासाठी असतो?
अनेक लोकांना असं वाटते की, लिफ्टमध्ये आपला आरसा हा चेहरा व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी लावलेला असतो.
लिफ्टची वाट पाहताना किंवा प्रवासात लोक आरशात पाहून स्वतःचं निरीक्षण करतात. त्यामुळे वेळ जाण्याचा त्रास जाणवत नाही.
लिफ्टचा लुक आकर्षक आणि आलिशान वाटावा म्हणूनही आरसा वापरला जातो.
लिफ्टमधील बंदिस्त जागा काही लोकांना घाबरवते (claustrophobia). आरसा असल्याने जागा मोठी भासते आणि मन शांत राहतं.