Sameer Amunekar
गोव्याची राजधानी पणजी असण्यामागे काही ऐतिहासिक, भौगोलिक आणि प्रशासकीय कारणे आहेत.
पोर्तुगीजांनी भारतात त्यांच्या वसाहती स्थापल्यानंतर प्रथम राजधानी वेल्हा गोवा (जुना गोवा) येथे होती. परंतु, 18व्या-19व्या शतकात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांनी राजधानी हलवण्याचा निर्णय घेतला.
पणजी हे मांडवी नदीच्या काठावर वसलेले असून बंदर आणि व्यापारासाठी सोयीस्कर ठिकाण होते. त्यामुळे प्रशासकीय कामकाजासाठी ते अधिक सोयीस्कर होते.
1843 साली पोर्तुगीज सरकारने अधिकृतपणे पणजीला गोव्याची नवीन राजधानी घोषित केली. त्यांनी येथे प्रशासकीय इमारती, चर्च, सरकारी कार्यालये आणि रहिवासी वसाहती विकसित केल्या.
1961 साली गोवा भारतात विलीन झाल्यानंतरही पणजी हीच राजधानी राहिली, कारण पणजी प्रशासकीय आणि भौगोलिकदृष्ट्या योग्य ठिकाण होतं.
पणजी आज हे गोव्याचे राजकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्र आहे.