Sameer Amunekar
हापूस आंबा संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. पण बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडतो, हापूस आंब्याला 'अल्फान्सो' हे पोर्तुगीज नाव कसं पडलं? हे जाणून घेऊया.
'अल्फान्सो' नावामागे एक ऐतिहासिक कथा आहे. १६व्या शतकात पोर्तुगीज भारतात आले आणि त्यांनी गोवा, कोकण किनारपट्टीसह काही भागांवर सत्ता स्थापन केली.
अल्फान्सो दि अलबुकर्क (Afonso de Albuquerque) हा पोर्तुगीजांचा एक अधिकारी होता.
अल्फान्सो दि अलबुकर्क नावाचा प्रभाव इतका होता की, त्याच्या नावावरूनच काही गोष्टींना पोर्तुगीजांनी नावं दिली. पोर्तुगीजांनी भारतात आंब्याच्या लागवडीवर लक्ष दिलं.
पोर्तुगीजांनी पारंपरिक देशी आंब्याच्या वाणांमध्ये सुधारणा करून अधिक गोड, टिकाऊ आणि निर्यातीस योग्य असा वान विकसित केला. हाच आंबा पुढे "हापूस" या नावाने कोकणात ओळखला गेला.
पण हापूस आंब्याला आंतरराष्ट्रीय ओळख म्हणून 'अल्फान्सो' हे नाव वापरलं गेलं. आजही जगभरात "अल्फान्सो मँगो" या नावाने हापूस आंब्याची मागणी असते.