Manish Jadhav
यंदाचा आयपीएल हंगाम अनेक गोष्टींनी गाजला. मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल पाहायला मिळाला. रोहितकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले.
आयपीएल हंगामापूर्वीच मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. फ्रँचायझीचा हा निर्णय क्रिकेट विश्वात सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला. यातच एका दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया चांगलीच गाजत आहे.
हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवणं नक्कीच पत्त्यावर पडलं. त्याचा नकारात्मक परिणाम झाला, असे दिग्गज खेळाडू सुनिल गावस्कर म्हणाले.
हार्दिक पांड्या यंदाच्या आयपीएल हंगामात अष्टपैलू कामगिरी करु शकला नाही. त्याला म्हणावी तशी छाप सोडता आली नाही. त्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
एलएसजीकडून एमआयच्या पराभवानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावस्कर म्हणाले की, हार्दिकची सुरुवात चांगली झाली नाही. त्याच्यावर नकारात्मक टिप्पण्यांचा परिणाम झाला.
गावस्कर म्हणाले की, एक व्यक्ती म्हणून तुम्ही कितीही कठोर असलात तरी तुमच्यावर काही गोष्टींचा परिणाम नक्कीच होतो. हार्दिकच्या बाबतीतही तेच घडले. प्रत्येकजण माणूस आहे.
हार्दिकने IPL 2024 मध्ये 14 सामन्यांमध्ये बॅटने फक्त 216 धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 46 होती. त्याची सरासरी 18 आणि 143.05 चा स्ट्राइक रेट होता.
हार्दिकने संपूर्ण हंगमात केवळ 11 विकेट्स घेतल्या, त्याची सरासरी 35.18 होती आणि त्याचा इकॉनॉमी-रेट 10.75 होता.
हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यावरुन चाहत्यांसोबत दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.
हार्दिक एक कर्णधार म्हणून आपली छाप सोडू शकला नाही. हंगामात त्याचे काही निर्णय मुंबई इंडियन्ससाठी फलदायी ठरले नाहीत.
हार्दिकच्या एमआयने हंगामाचा शेवट फक्त 8 गुणांसह केला आणि गुणतालिकेत ते तळाशी राहिले.