Cannes Film Festival 2024: कान्समध्ये बॉलिवूड सुंदरींचा जलवा

Manish Jadhav

55 वा कान्स फेस्टिव्हल 2024

फ्रान्समधील कान्समध्ये 55 वा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल 2024 सुरु आहे. या फेस्टिव्हलने जगभरातील सेलिब्रिटींना परत एकत्र आणले आहे.

Aishwarya Rai | Dainik Gomantak

भारतीय कलाकारांची हजेरी

यंदाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक भारतीय कलाकार सहभागी होत आहेत. ऐश्वर्या राय बच्चनपासून ते अदिती राव हैदरी सारख्या भारतीय स्टार्स कार्पेटवर कमबॅक करत आहेत, तर कियारा अडवाणी या वर्षी कमबॅक करत आहे.

Aishwarya Rai | Dainik Gomantak

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन 2002 पासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नियमित जात आहे. गेल्या दोन दशकात तिने फेस्टिव्हलमध्ये आपल्या दिमाखदार अंदाजाने छाप सोडली आहे.

Aishwarya Rai | Dainik Gomantak

शोभिता धुलिपाला

शोभिता धुलिपाला कान्स, फ्रान्सला जाताना दिसल्यापासून ती चर्चेत आली आहे. द मेड इन हेवन या अभिनेत्रीने अलीकडेच मंकी मॅन या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Sobhita Dhulipala | Dainik Gomantak

कियारा अडवाणी

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. ती कान्स 2024 मध्ये रेड सी फाउंडेशनच्या वुमन इन सिनेमा गाला डिनरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Kiara Advani | Dainik Gomantak

अदिती राव हैदरी

हीरामंडी स्टार अदिती राव हैदरी यावर्षी कान्समध्ये कमबॅक करत आहे.

Aditi Rao Hydari | Dainik Gomantak

जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिसनेही या फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे. ती या फेस्टिव्हलमध्ये दक्षिणपूर्व आशियाई डायस्पोराचे प्रतिनिधित्व करत आहे.

Jacqueline Fernandez | Dainik Gomantak

उर्वशी रौतेला

अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नियमित जाते. तिने यंदाच्या फेस्टिव्हल उद्घाटन समारंभाच्या रेड कार्पेटवर वॉक केला.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

कान्स फेस्टिव्हलचा कालावधी

हा महोत्सव 14 मे रोजी सुरु झाला असून 25 मे 2024 पर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे.

Cannes Film Festival 2024 | Dainik Gomantak
Prarthana Behere | Dainik Gomantak