Sameer Amunekar
बहुतेक महिलांचे कपडे सौंदर्य आणि शरीराच्या आकृतीला अनुकूल ठेवण्यासाठी डिझाइन केले जातात. खिसा टाकल्यास त्या डिझाइनमध्ये बदल होतो, म्हणून डिझायनर्स टाळतात.
महिलांच्या शरीररचनेनुसार पुढील भागावर खिसा असणे अस्वस्थता निर्माण करू शकते.
इतिहासात महिलांना नेहमीच हातात पर्स बाळगायची सवय लावली गेली. त्यामुळे कपड्यांवर खिशाची गरजच मानली गेली नाही.
कपड्यांमध्ये खिसा जोडणे म्हणजे अधिक कापड, अधिक मजुरी आणि जास्त खर्च. त्यामुळे अनेक ब्रँड्स याचा खर्च वाचवण्यासाठी खिसा देत नाहीत.
खिसा हा "पुरुषीपणा" दर्शवतो अशी चुकीची समजूत पूर्वीपासून रुजली आहे. त्यामुळे महिलांच्या कपड्यांना खिशा नसतो हे एक लिंगभेदी वारसा आहे.
खिसा नसल्यामुळे महिलांना बॅग, पर्स यांसारख्या वस्तू विकत घ्याव्या लागतात. ही एक अप्रत्यक्ष विक्री युक्ती असू शकते.
नवीन पिढीच्या डिझायनर्सनी हे लक्षात घेत महिलांचे कपडे आता खिशांसह डिझाइन केले जात आहेत. त्यामुळे हा प्रवाह हळूहळू बदलतोय.