Sameer Amunekar
सतत आणि मर्यादेपेक्षा व्यायाम केल्यास हृदयावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे हार्ट रेट अनियंत्रित होऊ शकतो.
वर्कआऊट सुरू करण्याआधी शरीर गरम न केल्यास अचानक वाढलेला ताण हृदयासाठी धोकादायक ठरू शकतो.
व्यायामादरम्यान शरीरातील पाणी कमी झाल्यास रक्तदाब अनियमित होतो आणि हृदयावर अतिरिक्त भार येतो.
थकलेल्या अवस्थेत व्यायाम केल्यास हृदयावर अधिक ताण येतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
शरीराला योग्य ऊर्जा न मिळाल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि थकवा लवकर जाणवतो.
व्यायामादरम्यान छातीत जडपणा, घशात धडधड, दम लागणे यासारखी लक्षणं दिसूनही दुर्लक्ष केल्यास धोका वाढतो.
योग्य ट्रेनर किंवा डॉक्टरचा सल्ला न घेता केलेला व्यायाम चुकीचा ठरू शकतो आणि हृदयावर विपरीत परिणाम करू शकतो.