Akshata Chhatre
दातांनी काळजी घेण्यासाठी खाताना काळजी घ्यायला हवी. त्यासाठी योग्य खाद्य पदार्थ निवडायचे आणि त्यांचा योग्य क्रम राखायचा. खूप गोड, खूप मऊ, चिकट आणि पिठूळ पदार्थ टाळावेत. गोळ्या, चॉकलेट, बिस्कीट अति प्रमाणात खाऊ नयेत.
पण नुसती चॉकलेट - बिस्किटच दात किडण्याला कारणीभूत ठरतात असे नव्हे, तर कोणतेही मऊ-चिकट, पिष्टमय, पिठूळ पदार्थ दात किडण्याला निमंत्रण देऊ शकतात.
पेढा, बर्फी, पोहे, पेस्ट्रीज, केक, शिरा, नानकटाई, लाडू, गुलाबजाम इत्यादी प्रकारचे पदार्थ खूप गोड आणि मऊ असतात. खाल्ल्यानंतर त्यांचे बारीक-बारीक कण हिरडी व दातांत अडकून बसतात.
या उलट, धागेदार, कच्ची-कुरकुरीत फळे, कडक-टणक फळे, पालेभाज्या खाल्ल्यास दात आपोआप स्वच्छ होतात; कारण अशा कडक-टणक-धागेदार अन्नपदार्थांचे दाताशी घर्षण होते आणि दात आपोआपच घासले जातात.
खाल्ले तर जास्त चांगल्या चुळा भराव्यात वा दात घासावेत; पण दर वेळी हे असे शक्य नसते. म्हणूनच जेवताना सर्वांत शेवटी काही कडक-टणक-धागेदार फळ, पालेभाजी वा तत्सम अन्नपदार्थ खावेत.