Akshata Chhatre
पिवळसर दात तुम्हाला त्रास देतायत का? पिवळ्या दातांमुळे चार चौघात बोलणं कठीण होतंय का? थांबा, घाबरू नका आम्ही तुम्हाला मार्ग सुचवणार आहोत.
1 चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडंसा लिंबू पिळा, याची पेस्ट बनवा आणि हळुवार ब्रश करा. या पेस्टचा वापर आठवड्यातून 2 वेळा झाला पाहिजे.
दिवसातून दोन वेळा ब्रश करा. खाल्ल्यानंतर तोंड धुणं आवश्यक आहे हे कधीही विसरू नका. खूप जोरात ब्रश करू नका यामुळे इनॅमल खराब होतात.
खोबरेल किंवा तीळ तेलाने रोज सकाळी 5-10 मिनिटं गुळण्या करा, परिणामी तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात आणि दात स्वच्छ व मजबूत राहतात
जास्त चहा किंवा कॉफी यांमुळे दात पिवळे होतात. धूम्रपानामुळे इनॅमल खराब होतो, त्याऐवजी लिंबूपाणी, फळांचा रस निवडा
दूध, चीज यांसारखा कॅल्शियमयुक्त आहार घ्या .साखर व ऍसिडिक पदार्थ कमी करा आणि दर ६ महिन्यांनी डेंटिस्टकडे चेकअप करा.