Sameer Amunekar
जेवण केल्यानंतर शरीराला ते पचवण्यासाठी वेळ लागतो. जेवणानंतर लगेच झोपल्यास अन्न नीट पचत नाही व अॅसिडिटी, गॅस यांसारख्या समस्या होतात.
उशिरा जेवण केल्यास पोटावर ताण येतो, त्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. 3 तासाचा अंतर ठेवल्यास शरीराला विश्रांती मिळते आणि गाढ झोप लागते.Health Tips
रात्री उशिरा जेवण केल्याने शरीरात साखर व चरबी जमा होण्याची शक्यता वाढते. वेळेवर जेवण केल्यास शरीर त्याचा योग्य वापर करू शकतं.
अन्नपचनासाठी पुरेसा वेळ दिला तर अॅसिड रिफ्लक्स, अपचन, गॅस यासारख्या त्रास टाळता येतात.
वेल टाइम डिनर केल्यास ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहतो, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी महत्त्वाचं आहे.
रात्री उशिरा जेवण करणं हे हृदयविकाराचा धोका वाढवू शकतं. वेळेवर जेवण केल्याने हृदय आरोग्य सुधारतं.
सकाळी जाग येणं, दिवसभर ऊर्जा टिकवणं यासाठी शरीराचं सर्कॅडियन रिदम संतुलित असणं आवश्यक आहे. त्यासाठी वेळेवर झोप व त्याआधी वेळेवर जेवण गरजेचं असतं.