Sameer Amunekar
बहुतांश साप नैसर्गिक परिस्थितीत १० ते २५ वर्षे जगतात. यामध्ये त्यांचा प्रजातीचा प्रकार, अधिवास आणि शिकारीपासून बचाव करण्याची क्षमता महत्त्वाची असते.
जर सापांना प्राणीसंग्रहालय किंवा संरक्षण केंद्रात योग्य वातावरण दिलं गेलं, तर ते ४० ते ५० वर्षांपर्यंत सुद्धा जगू शकतात. तिथे त्यांना अन्न, तापमान आणि वैद्यकीय देखरेख योग्य प्रमाणात मिळते.
नैसर्गिक जगात अनेक साप लहान वयातच मृत्युमुखी पडतात कारण त्यांच्यावर अनेक शिकाऱ्यांचा धोका असतो – उंदीर, मोठे पक्षी, माकडे आणि माणसं सुद्धा.
प्राणीसंग्रहालयात एका बॉल पायथन सापाने तब्बल ४७ वर्षे आयुष्य गाठले होते. ही साप प्रजाती फारसा आक्रमक नसतो आणि दीर्घायुषी मानली जाते.
तापमान, आर्द्रता, शिकार उपलब्धता आणि नैसर्गिक आपत्तींमुळे सापांचं आयुष्य लहान होऊ शकतं. काही विषारी साप जास्त काळ जगू शकतात, तर काही कमी.
काही ठिकाणी असे दावे केले गेले आहेत की काही नाग किंवा विषारी साप १०० वर्षांपर्यंत जगतात, पण याला कोणतंही शास्त्रीय आधार सध्या उपलब्ध नाही.
विषारी सापही नेहमीच जास्त आयुष्याचे नसतात.