Sameer Panditrao
हिवाळा आला की थंडीचा आनंद, पहाटेचे धुके असे क्षण अनुभवायला मिळतात. मात्र, या ऋतूत हवेतील प्रदूषणाची तीव्रता वाढल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
पावसाळा आणि उन्हाळ्यात तुलनेने कमी असणारे प्रदूषण हिवाळ्यात मात्र उच्च स्तरावर पोहोचते.
हवेतील प्रदूषण मुख्यतः वाहने, कारखाने, बांधकामातील धूळ, आणि विविध मानवी क्रियांमुळे होते. मात्र हिवाळ्यात या प्रदूषणाची तीव्रता अधिक असल्याचे दिसून येते.
उन्हाळ्यात, जमिनीवरील गरम हवेसोबत प्रदूषित कणही हवेत मिसळून दूर जातात. पावसाळ्यात ते जमिनीत मिसळतात. पण हिवाळ्यात हवा थंड असल्यामुळे ते स्थिर राहतात.
जमिनीलगत असणारे विषारी कण वर जात नाहीत, तर हवेतच स्थिर राहतात. परिणामी हिवाळ्यात जमिनीलगत हवेतील प्रदूषण अधिक तीव्र होते.
सकाळी-संध्याकाळी बाहेर जाणे टाळणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. हवेतील विषारी कणांपासून बचाव करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या मास्कचा वापर करावा.
रस्त्यालगत राहणाऱ्यांनी घरात विषारी कण येऊ नयेत म्हणून योग्य खबरदारी घ्यावी. ऊन पडल्यावर बाहेर जावे.