Akshata Chhatre
कुठलंही महत्त्वाचं काम सुरू करण्यापूर्वी दही-साखर का खाल्लं जातं? चला जाणून घेऊया!
भारतीय संस्कृतीत परीक्षा, नोकरीचा पहिला दिवस, किंवा नवीन कामाच्या सुरुवातीला दही-साखर खाल्ली जाते. यामागे शास्त्र आहे.
दहयामध्ये असतात चांगले प्रोबायोटिक्स जे पचनसंस्थेला मदत करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
साखर मेंदूपर्यंत त्वरित ग्लुकोज पोहोचवते ज्यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि लक्ष केंद्रित करणं सोपं होतं.
शिवाय कॅल्शियम, बी-१२, पोटॅशियम यांसारखी जीवनसत्त्वं परीक्षेच्या किंवा मुलाखतीच्या दिवशी पोट भरलं नसलं तरी ते पोषण मिळवून देतं.
दही आणि साखर तणावग्रस्त हार्मोन्स कमी करतात आणि शांतीकारक रसायनं वाढवतात. मन शांत आणि सकारात्मक राहतं.