Akshata Chhatre
ब्रगांझा घाट म्हणजे गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेला एक हिरवागार पर्वतीय मार्ग, जो निसर्गप्रेमी आणि रेल्वेप्रेमींसाठी जणू स्वर्ग आहे.
मुसळधार पावसात उगम पावणारे धबधबे, दाट जंगल आणि पर्वतशिखरांची मालिका म्हणजे इथल्या मनमोहक दृश्यांचं आगार आहे.
भारतातील सर्वात मोठ्या आणि आकर्षक धबधब्यांपैकी एक म्हणजे दूधसागर धबधबा इथे पाहायला मिळतो. रेल्वे ट्रॅकवरून दिसणारा रोमांचक नजारा पावसात स्वप्नवत असतो.
ब्रगांझा घाट गोव्याला कर्नाटकशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या घाटात अनेक वळणे, बोगदे आणि उतार आहेत जे रेल्वे प्रवासाला एक थरारक अनुभव देतात.
२६ किमी लांबीच्या या 'घाट सेक्शन' मध्ये रेल्वे प्रवासाची मजा घेता येते. कुळे ते कॅसल रॉक दरम्यानचा भाग निसर्गप्रेमींनी नक्की भेट द्यावा असाच आहे.
घाटातील बोगदे, चढ-उतार, पावसातले धबधबे, रेल्वे आणि निसर्ग यांचं अद्भुत मिश्रण फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी या जागेला उत्तम बनवतं.