Sameer Panditrao
६ जून १९७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
या सोहळ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
महाराष्ट्रातील अनेक वतनदार, सरदार, सामंत शिवरायांचे महत्व नाकारत होते. त्यांना ही चपराक होती.
मुघल आणि इतर शत्रू स्वराज्याची सतत हेटाळणी करायचे. राज्याभिषेकानंतर त्यांना महाराजांना छत्रपती म्हणून स्वीकारणे भाग पडले.
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना एक स्वतंत्र राजा म्हणून मान्यता मिळाली.
छत्र-सिंहासनामुळे स्वराज्याबद्दल रयतेला वाटणारा विश्वास द्विगुणित झाला.
अधिकृत सिंहासन स्थापन केल्यामुळे महाराजांना कायदेकानून करणे आणखी सुलभ झाले.