Sameer Panditrao
शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी जाड आणि लांबीला कमी असायच्या.
मराठे चपळ, काटक होते. ते मोगल, पठणांसारखे उंच, भारदस्त न्हवते. शिवाय सह्याद्रीत डोंगररांगात मावळ्यांना घोडदौड करावी लागे.
शिवाजी महाराजांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यातून त्यांनी अनेक महत्वाचे बदल केले.
हलक्या आणि टिकाऊ धातूच्या तलवारी बनवल्या.
तलवारीची मूठ बंद करून घेतली, ती तुटू नये म्हणून त्याला पन्हाळ केली.
मुठीच्या मागे गज आणि ती सुटू नये म्हणून अस्तर लावायला सुरुवात केली.
धोप, खांडा, फिंरग, कत्ती, समशेर या मराठा तलवारी प्रसिद्ध झाल्या