Sameer Panditrao
ही दंतकथा फार जुनी आहे.
एकदा एक मच्छीमार विठुरायाच्या दर्शनासाठी आला.
त्याने दर्शनाला येताना सोबत दोन मासे आणले होते.
पुजारी व इतर भक्तांनी त्याला मासे घेऊन दर्शनास जाऊ दिले नाही.
दु:खी मच्छिमाराने गुडघे टेकून देवाचा धावा केला. त्याचा कळवळा बघून देव प्रसन्न झाला आणि त्याने मच्छीमारास दर्शन दिले.
देवाने ते मासे हातात घेतले आणि दागिन्यासारखे कानात परिधान केले.
तेंव्हापासून विठुरायाच्या कानात मत्स्य आकाराचे दागिने आहेत. ही दंतकथा तेंव्हापासून सांगितली जाते.