Sameer Amunekar
रस्त्यावरून धावणारी सायकल, कार असो की हवेत उडणारे विमान... सर्वांच्या टायर्सचा रंग नेहमी काळाच का असतो? यामागे केवळ 'लुक' नसून एक मोठे वैज्ञानिक कारण दडलेले आहे.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण सुरुवातीच्या काळात टायर्स पांढऱ्या किंवा फिकट तपकिरी रंगाचे असायचे. कारण ते थेट नैसर्गिक रबरापासून (Natural Rubber) बनवले जात असत.
हे पांढरे टायर्स वजनाने हलके आणि खूप नाजूक होते. रस्त्यावरील उष्णता आणि वाहनाचा भार सहन न झाल्यामुळे ते खूप लवकर झिजायचे आणि त्यांना तडे जाऊन ते फाटायचे.
या समस्येवर मात करण्यासाठी संशोधकांनी रबरामध्ये 'कार्बन ब्लॅक' हा विशेष पदार्थ मिसळला. या कार्बन पावडरमुळे रबराची ताकद प्रचंड वाढली आणि टायर्सना गडद काळा रंग मिळाला.
उन्हाळ्यात वेगाने गाडी चालवताना घर्षणामुळे टायर्स खूप तापतात. 'कार्बन ब्लॅक' टायर्सना अतिउष्ण होण्यापासून वाचवतो, ज्यामुळे हायवेवर टायर फुटण्याचा मोठा धोका टळतो.
काळे टायर्स रस्त्यावर वाहनाची पकड (Grip) मजबूत ठेवतात. उत्तम ग्रिपमुळे अचानक ब्रेक लावल्यास गाडी घसरत नाही आणि अपघात टळतात.