Sameer Panditrao
चेन्नई सुपरकिंग्ज, कोलकाता यांच्यातील सामन्यात अनिल कुंबळे आणि सिद्धू समालोचनासाठी एकत्र बसले.
अनिल कुंबळे यांनी सांगितले की ते दोघे पहिल्यांदाच हिंदी कॉमेन्ट्रीसाठी एकत्र आले आहेत.
यावेळी सिद्धू यांनी मोठा खुलासा केला.
अनिल कुंबळे यांना जंबो या टोपणनावाने ओळखतात.
इथे त्यांनी खुलासा केला की कुंबळे यांना जंबो हे नाव सिद्धू यांनीच दिले आहे.
१९९१ साली इराणी ट्रॉफीत गोलंदाजी करताना कुंबळे यांच्या एका उसळत्या चेंडूवर फिल्डिंग करणाऱ्या सिद्धू यांनी 'जम्बो जेट' अशी प्रतिक्रिया दिली
त्या दिवसानंतर हळूहळू कुंबळे यांचे जम्बो हे नाव प्रसिद्ध झाले.