Sameer Panditrao
चिन्नास्वामी स्टेडियमवर माजी आरसीबी कर्णधार विराट कोहली एका कार्यक्रमाला उपस्थित होता.
यावेळी त्याने आपल्या कारकिर्दीत सर्वात कठीण वाटलेले तीन गोलंदाज कोण होते हे सांगितले.
त्याने प्रत्येक फॉरमॅटमधील एकेका बॉलरचे नाव घेतले आहे.
एकदिवसीय सामन्यांत (ODI) श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याच्याविरुद्ध खेळणे सर्वात कठीण वाटल्याचे कोहलीने मान्य केले.
याशिवाय कोहलीने इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीद याचा उल्लेख केला की, तो ODI मध्ये त्याला नीट खेळू शकत नसे.
विराटने सांगितले की कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा सर्वात कठीण प्रतिस्पर्धी होता.
T20 क्रिकेटबाबत कोहलीने वेस्ट इंडिजचा माजी मिस्ट्री स्पिनर आणि केकेआरचा दिग्गज खेळाडू सुनील नारायण याला सर्वात कठीण गोलंदाज म्हटले आहे.