Sameer Amunekar
हवाई हल्ले (Airstrikes) बहुतांश वेळा रात्रीच का होतात, यामागे अनेक रणनीतिक, तांत्रिक कारणं असतात.
रात्रीच्या अंधारात शत्रूच्या हालचाली आणि यंत्रणा जास्त गुप्त ठेवता येतात. त्यामुळे हल्लेखोर आपली ओळख आणि दिशा लपवू शकतात.
रात्रीच्या अंधारामुळे शत्रूच्या अॅंटी-एअरक्राफ्ट गन, रडार किंवा व्हिज्युअल निरीक्षणातून वाचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे विमानं सुरक्षित राहतात.
रात्रीचा हल्ला अधिक घाबरवणारा आणि गोंधळ निर्माण करणारा असतो. लोक झोपेत असतात, त्यामुळे तातडीनं प्रतिसाद देणं कठीण जातं. यामुळे भीती आणि अव्यवस्था निर्माण होते.
रात्री हल्ला केल्यास शत्रूला त्वरित उत्तर देणं किंवा प्रतिहल्ला करणं कठीण होतं. विशेषतः जर त्यांचे रडार वा संरक्षण व्यवस्थाही झोपेत असतील, तर प्रभावी प्रतिक्रिया द्यायला वेळ लागतो.
सैन्यांकडे रात्रीच्या अंधारात ऑपरेशनसाठी प्रगत इन्फ्रारेड आणि नाईट व्हिजन तंत्रज्ञान असतं. त्यामुळे त्यांना अंधारातही टार्गेट अचूकपणे ओळखता येतं.