Sameer Amunekar
मुलांच्या रोजच्या जेवणात काही "सुपरफूड्स" समाविष्ट केल्यास त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीपासून मेंदूच्या कार्यक्षमतेपर्यंत अनेक गोष्टींवर सकारात्मक परिणाम होतो.
अंड्यांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन B12, आणि 'कोलीन' हे मेंदूच्या विकासासाठी आवश्यक घटक भरपूर प्रमाणात असतात. उकडलेली अंडी, ऑम्लेट किंवा भुर्जी स्वरूपात देऊ शकता.
पालक, मेथी, शेपू यांसारख्या भाज्यांमध्ये लोह (iron), कॅल्शियम आणि फायबर्स असतात, जे रक्तशुद्धी, हाडं बळकट करणं आणि पचन सुधारण्यास मदत करतात.
फळं ही नैसर्गिक व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत. सफरचंद पचनासाठी, केळी ऊर्जा मिळवण्यासाठी, तर बेरीज मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
दूध, दही, ताक यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D भरपूर असते. हे हाडं आणि दात मजबूत करतं. यामुळे झोपही सुधारते.
बदाम, अक्रोड, खजूर, आणि तीळ, फ्लॅक्ससीड्स यांसारख्या बीयांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रथिने आणि हेल्दी फॅट्स असतात. यामुळे मेंदू आणि त्वचा दोन्ही निरोगी राहतात. मात्र योग्य प्रमाणातच द्यावं.