Akshata Chhatre
चाणक्यांनी मैत्रीच्या निवडीबाबत स्पष्ट आणि कठोर नियम सांगितले आहेत. चुकीच्या व्यक्तींशी मैत्री केल्यास जीवनात संकटं ओढवू शकतात.
ते गोड बोलतात पण पाठीमागे फसवतात. अशा लोकांशी मैत्री म्हणजे संकटाला आमंत्रण.
त्यांना इतरांचे विचार, भावना मान्य नसतात. त्यांचा अहंकार तुमचा आत्मविश्वास खच्ची करतो.
त्यांना तुमच्याशी खऱ्या मैत्रीपेक्षा फक्त फायदा हवाय. नातं संपलं की तेही नाहीसे होतात.
त्यांचे विचार, कृती सतत बदलतात. अशा लोकांच्या मैत्रीत तुम्हाला कधीच स्थैर्य मिळणार नाही.
ते तुमच्या भावना, प्रतिष्ठेचा विचारही करत नाहीत. अशा लोकांमुळे मानसिक त्रास आणि अपमान सहन करावा लागतो.