Akshay Nirmale
श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज, माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन रविवारी ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर अवतरला.
मुरलीने इफ्फीमध्ये इन कॉन्व्हर्सेशन सत्रात संवादही साधला.
मुरलीच्या जीवनावर ‘A Legendary 800 - Against all odds’ या नावाचा बायोपिक येत आहे. त्यानिमित्त मुरली इफ्फीमध्ये आला होता.
दरम्यान, यावेळी संवाद साधताना मुरलीने भारताचा अनिल कुंबळे हा त्याचा आवडता बॉलर असल्याचे सांगितले.
त्याचे ८०० विकेट्सचे रेकॉर्ड कोण तोडू शकेल, असे विचारले असता मुरली म्हणाला की, सध्या इंग्लंडचा जेम्स अँडरसन या विक्रमाच्या जवळ आहे इतरांच्या तुलनेत. त्याला सर्वाधिक संधी आहे, असे मुरलीधरन म्हणाला.
या बायोपिकमध्ये मधुर मित्तल याने मुरलीधरनची भूमिका साकारली आहे.
1995 मध्ये ऑस्ट्रेलियात त्याच्या गोलंदाजीच्या अॅक्शनवरून झालेल्या 'चकिंग कॉन्ट्रोव्हर्सी'बद्दल बोलताना मुरली म्हणाला की, हे त्याला खाली खेचण्यासाठी हेतुपुरस्सर केले गेले होते.