Akshata Chhatre
सध्या ख्रिस्ती धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा असा आठवडा सुरु आहे. बायबलप्रमाणे याच काळात येशू ख्रिस्ताला क्रूसावर खिळवण्यात आलं होतं.
पण तुम्ही जर का नीट पाहिलं असेल तर येशू ख्रिस्तासोबात आणखीन दोघांना देखील क्रूसावर खिळवण्यात आलं होतं. हे दोघे कोण? आणि त्यांना का क्रूसावर चढवलं होतं?
गॉस्पेलनुसार, येशूच्या उजव्या व डाव्या बाजूला दोन चोरांना क्रूसावर खिळवण्यात आलं होतं.
ख्रिश्चन परंपरेनुसार, डिस्मस आणि गेस्टस अशी यांची नावं आहेत. यापैकी डिस्मस येशूला त्याची आठवण ठेवायला सांगतो तर गेस्टसजर तू खरोखर देवाचा पुत्र आहेस, तर स्वतःला आणि आम्हालाही वाचव! अशी याचना करतो.
डिस्मस आणि गेस्टस ही नावे बायबलमध्ये नाहीत, पण ती निकोडेमसच्या गॉस्पेल सारख्या अपोक्रिफल ग्रंथांमधून मिळाली आहेत.
डिस्मस आणि गेस्टस हे शेवटच्या क्षणापर्यंत मनात असलेल्या पश्चात्ताप आणि आशेचं प्रतीक आहेत.