Akshata Chhatre
तुम्हाला विमानाने फिरायला आवडतं? आणि विमानाने फिरत असताना आपल्याला फ्लाईट मोड चालू करायला सांगतात आणि याचं पालन करावंच लागतं. असं का?
एखादवेळी आपण फ्लाईट मोड सुरु केलाच नाही किंवा विमानाने आकाशात भरारी घेतल्यानंतर फ्लाईट मोड काढला तर?
लक्षात घ्या मोबाईलमधून होणाऱ्या रेडिओ सिग्नल्समुळे विमानातील उपकरणांमध्ये व्यत्यय येऊ शकतो म्हणून फ्लाइट मोड आवश्यक आहे.
होय, एकावेळी अनेक मोबाईल उपकरणे नेटवर्क शोधत राहिल्यास, याचा परिणाम पायलट्सच्या कम्युनिकेशनवर होऊ शकतो.
मोबाईलमधील सिग्नल्समुळे कॉकपिट आणि ग्राउंड कंट्रोल यांच्यातील रेडिओ संवादात आवाज येऊ शकतो.
एक फोन फारसा धोका निर्माण करत नाही, पण विमानात सर्वांनीच असे केल्यास सिग्नलमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो, म्हणून फ्लाइट मोड लावल्यानंतर मोबाईलचे सेल्युलर, वायफाय आणि ब्लूटूथ बंद होतात, आणि डिव्हाइस 'सुरक्षित' रहातो.