Manish Jadhav
टोमॅटो केवळ अन्नाची चवच वाढवत नाहीतर त्यात असलेले पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर असतात.
टोमॅटो खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. या आजारांच्या पीडितांनी अजिबात टोमॅटोचे सेवन करु नये.
मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी मर्यादित प्रमाणात टोमॅटो खावेत किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ते खाणे टाळावे. टोमॅटोमध्ये असलेले पोटॅशियम मूत्रपिंडासाठी हानिकारक ठरु शकते.
टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात आम्ल असते, जे आम्लपित्त किंवा पोटाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी हानिकारक ठरु शकते.
टोमॅटोमध्ये सोलानाइन कंपाऊंड असते, जे काही लोकांमध्ये सांधेदुखी आणि सूज वाढवू शकते.
काही लोकांना टोमॅटोची अॅलर्जी असू शकते. टोमॅटोमध्ये असलेल्या काही प्रथिने शरीरात अॅलर्जी निर्माण करु शकतात.