Sameer Amunekar
मॅगीसारख्या इन्स्टंट नूडल्सचे दररोज सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. दररोज मॅगी खाल्ल्यास पुढील प्रकारचे आजार होण्याचा धोका वाढतो.
मॅगीमध्ये उच्च प्रमाणात रिफाइंड कार्बोहायड्रेट असते, जे रक्तातील साखर पातळी झपाट्याने वाढवू शकते. त्यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो.
मॅगीमध्ये फॅट्स आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असते, तर पोषणमूल्य कमी असते. रोज खाल्ल्यास वजन वाढते आणि लठ्ठपणामुळे इतर आजारही होऊ शकतात.
सॅच्युरेटेड फॅट्स आणि जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढतो, जो हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढवतो.
मॅगीमध्ये प्रिजर्वेटिव्हज आणि कृत्रिम घटक असतात, जे पचनसंस्थेवर परिणाम करू शकतात. गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या होऊ शकतात.
काही इन्स्टंट नूडल्समध्ये असणाऱ्या रासायनिक पदार्थांमुळे (जसे की प्रिजर्वेटिव्ह्ज, कृत्रिम रंग) कर्करोगाचा धोका वाढतो, असे काही संशोधनात आढळले आहे.