Sameer Amunekar
कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे ॲसिडिटी वाढू शकते आणि छातीत जळजळ होऊ शकते.
कॅफिनमुळे रक्तदाब वाढू शकतो, त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी कॉफी मर्यादित प्रमाणात घ्यावी.
जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्याने हृदयाचे ठोके वाढू शकतात, त्यामुळे हृदयरोग असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी.
जास्त कॅफिन गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हानिकारक ठरू शकते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
कॅफिन झोपेच्या चक्रावर परिणाम करत असल्याने झोपेच्या तक्रारी असलेल्या लोकांनी संध्याकाळी किंवा रात्री कॉफी टाळावी.
कॉफी शरीरातील लोह (Iron) शोषण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते, त्यामुळे अशक्तपणा असलेल्या लोकांनी कॉफी घेणे टाळावे.