Sameer Amunekar
शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर आहे. ऊसाच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि मँगनीज यांसारखे कॅन्सरशी लढण्यास मदत करणारे पोषक घटक असतात.
ऊसाच्या रसामध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते, त्यामुळं पोटाच्या समस्या दूर होतात.
ऊसाच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असते जी शरीराला ऊर्जा देते.
ऊसाचा रस किडनी स्टोनची समस्या कमी करण्यास मदत करतो.
ऊसाच्या रसामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
ऊसाचा रस कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि मँगनीजचा समृद्ध स्रोत आहे. NIH आणि अनेक अभ्यासांच्या निष्कर्षांनुसार कॅन्सरशी लढण्यास ऊसाचा रस फायदेशीर आहे.
ऊसाच्या रसामध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळं हाडे मजबूत करण्यास मदत होते.