Manish Jadhav
केळी हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे, पण काही विशिष्ट आजार किंवा परिस्थितींमध्ये काही लोकांनी केळीचे सेवन टाळणे किंवा मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक असू शकते.
आज (8 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कोणत्या लोकांनी केळीचे सेवन करु नये याविषयी जाणून घेणार आहोत.
केळीमध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी केळी अजिबात खाल्ली नाही पाहिजे.
काही लोकांना केळीत असलेल्या प्रोटीनमुळे अॅलर्जी होऊ शकते. जसे की, त्वचेवर पुरळ येणे, ओठ, जीभ किंवा घशामध्ये सूज, श्वास घेण्यास त्रास.
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. मूत्रपिंड नीट काम करत नसेल तर शरीरातून पोटॅशियम बाहेर टाकणे कठीण होते. त्यामुळे हायपरकलेमिया (रक्तात पोटॅशियम वाढणे) होऊ शकतो.
कच्ची केळी जास्त खाल्ल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जास्त प्रमाणात केळीचे सेवन शरीरासाठी हानीकारक ठरु शकते.